मुंबई : मुंबईतील कांदिवली परिसरात एक इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली. हंसा हेरिटेज नावाच्या या 15 मजली इमारतीला ही लागली. इमारतीच्या 14व्या मजल्यावर आग लागली होती आणि यामध्ये 2 जणांना मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही आग लागली होती. दरम्यान आग का लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ज्यावेळी इमारतीला आग लागली त्यावेळी 7 जणं आत अडकले होते. यामधील 5 जणांना वाचवण्यात यश आलं. मात्र 2 जणांचा कांदिवलीतील रूग्णालयात मृत्यू झाला आहे.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रात्री पावणे बाराच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश मिळालं आहे. त्यापूर्वी इमारतीची लाईट्स पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या.
तर कालच्या दिवसात अहमदनगरमधील जिल्हा रूग्णालयाला भीषण आग लागली होती. ही आग सकाळी 10 वाजताच्या सुमारास लागली होती आहे. या आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी झी 24 तासला दिली होती.