नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा तपास करण्यासाठी केंद्र सरकारने चीनकडून किट मागवले होते. चीनने ५.५ लाख लिक्विड एंटॉबॉडी टेस्ट किट भारतात पाठवले देखील होते. वेगवेगळ्या राज्यात हे किट वितरित करण्यात आले. पण आता याप्रकरणी चीनी कंपन्यांचे मोठे विधान समोर आले आहे.
ज्या दोन कंपन्यांनी लिक्विड एंटीबॉडी टेस्ट भारतात पाठवले होते, त्यांनी रिसर्च टीमकडून सहकार्य मागितले आहे. या किटचा चांगला परिणाम मिळण्यासाठी गुणवत्ता नियम काटेकोरपण पाळावे लागतील असे ग्वांगझू वोंदफो बायोटेक आणि लिवजोन डायग्नोस्टिक यांनी आपल्या वेगवेगळ्या विधानांमधून स्पष्ट केले. या किटचा वापर करताना विविध दिशानिर्देशांचे पालन करायला हवे असे देखील ते म्हणाले.
चीनकडून आलेल्या खराब लिक्विड एंटीबॉडी टेस्ट किटची प्राथमिक चाचणी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडीया करु शकते अशी माहीती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. चीनी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉल करुन यासंदर्भातील अधिक चौकशी केली जाऊ शकते.
आम्ही यांसदर्भात करेपर्यंत या किटच्या चाचणीचा प्रयोग थांबवावा असे आवाहन आयसीएमआपने देशाला केले होते. गेल्या आठवड्यात भारत ने चीनच्या दोन कंपन्यांकडून एंटीबॉटी किट खरेदी करुन विविध राज्यांत वितरित केले होते.