भरपाण्यात भरधाव वेगात धावली एक्स्प्रेस

नालासोपारा रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचले आहे. याच पाण्यातून एक एक्स्प्रेस ट्रेन भरधाव वेगात गेली आहे. गाडी एवढी भरधाव वेगात होती की रुळावरचे पाणी पूर्ण उडून मोटर्मनाच्या समोर आले होते. 

Updated: Sep 20, 2017, 03:17 PM IST
भरपाण्यात भरधाव वेगात धावली एक्स्प्रेस title=

नालासोपारा : नालासोपारा रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचले आहे. याच पाण्यातून एक एक्स्प्रेस ट्रेन भरधाव वेगात गेली आहे. गाडी एवढी भरधाव वेगात होती की रुळावरचे पाणी पूर्ण उडून मोटर्मनाच्या समोर आले होते. 

पाठीमागच्या डब्यांनी उडून रुळावरील पाणी हे प्लॅट फॉर्म वर येत होते. यात कोणतीही दुर्घटना झाली नाही. पण पाण्याचा अंदाज आला नसता तर मोठी दुर्घटनाही झाली असती. साडे बाराच्या सुमारास नालासोपारा रेल्वे स्थानकातून ही ट्रेन धावली आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

पाहा व्हिडिओ