swiggy : मनसेच्या 'त्या' आरोपावर स्विगीकडून हे स्पष्टीकरण

स्विगीसह (Swiggy) इतर काही ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांकडून मुंबईत थेट गोमांस विक्री?

Updated: Apr 10, 2022, 09:35 PM IST
swiggy : मनसेच्या 'त्या' आरोपावर स्विगीकडून हे स्पष्टीकरण title=

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray) यांनी भोंगाप्रकरणी दिलेल्या आदेशानंतर राजकारण चांगलेच पेटलं. भोंग्यांनंतर मनसेने स्विगीसह (Swiggy) इतर काही ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांकडून मुंबईत थेट गोमांस विक्री केली जात असल्याचा आरोप केला.

मुंबईत होणाऱ्या गोमांस विक्रीबाबत मनसेनं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेत निवेदन दिलं. संबंधित कंपन्यांच्या संचालकांवर गुन्हा दाखल करावा. तसं न केल्यास येत्या काळात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेनं दिला.

मनसेच्या या इशाऱ्यानंतर स्विगीने आपलं स्पष्टीकरण दिलंय. स्विगी सर्व स्थानिक कायद्यांचे कठोर पालन करते. स्विगी सर्व आवश्यक परवाने घेऊनच काम करते आणि मांस स्टोअर व्हेंडर्ससोबत काम सुरू करण्यापूर्वी त्यांना आणि रेस्टॉरंट्सना स्थानिक कायद्यांविषयी माहिती देऊन जागरुकही करते.

स्विगीचे भागीदार ज्या राज्यांमध्ये कार्यरत आहेत तेथील कायदे, नियम, नियमन, उपनियम यांचे पालन करण्यास ते कराराने आणि कायद्याने बांधिल आहेत. स्विगी आपल्या उद्योगात कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नेहमीच स्थानिक अधिकाऱ्यांना सहकार्य करत असते आणि यापुढेही करत राहील,अशी ग्वाही स्विगीच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.