EXIT POLL 2019: मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार की महाआघाडीचं सरकार येणार?

देशात कोणाची सत्ता येणार... पाहा लोकसभा निकालाआधी एक्झिट पोल

Updated: May 19, 2019, 05:14 PM IST
EXIT POLL 2019: मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार की महाआघाडीचं सरकार येणार? title=

Loksabha Election 2019, मुंबई : देशात कोणाची सत्ता येणार? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला जाणून घायचं असेल. आज लोकसभा निवडणूक 2019 च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. मतदान संपताच झी24 तास वर तुम्ही एग्झिट पोल (Exit Poll) पाहू शकता. संध्याकाळी ५ वाजल्यापासून लोकसभा निवडणुकीवर महाचर्चा आणि ६ वाजल्यापासून एक्झिट पोल तुम्ही पाहू शकता.

लोकसभा निवडणूक 2019 च्या रणसंग्रामात भारतीय जनता पक्ष (भाजप) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या 5 वर्षातील केलेल्या कामगिरीवर सत्तेत पुन्हा येण्याचा दावा केला आहे.

भाजपचा थेट सामना हा मुख्य विरोधी पक्ष काँग्रेससह अखिलेश यादव यांच्या सपा, मायावती यांच्या बसपा, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस, एमके स्टालिन यांच्या डीएमके, चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी आणि महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत होत आहे.

झी24तास वृत्तवाहिनीसह 24तास.कॉम वर देखील तुम्ही हा एक्झिट पोल पाहू शकता.