राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून गुन्हा दाखल

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा याच्या पुन्हा एकदा अडचणी वाढल्या आहेत.

Updated: May 19, 2022, 07:59 AM IST
राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून गुन्हा दाखल title=

मुंबईः अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा याच्या पुन्हा एकदा अडचणी वाढल्या आहेत. ईडीने राज कुंद्राविरुद्ध पॉर्न रॅकेट प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी 2021 मध्ये अटक केली होती.  राज कुंद्रा सध्या जामिनावर बाहेर आहे. मात्र आता ईडीनं राज कुंद्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ईडीकडून लवकरच राज कुंद्राला समन्स बजावण्याची शक्यता आहे. ईडी सध्या राज कुंद्रा आणि प्रकरणातील इतर आरोपींच्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मिळालेल्या सर्व माहितीच्या अभ्यासानंतरच गेल्या आठवड्यातच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यामुळे लवकरच ईडीकडून या प्रकरणाशी संबंधित सर्वांना चौकशीसाठी समन्स पाठवणार आहे. ईडीने मुंबई पोलिसांकडून FIRची प्रत मिळवली असून आरोपपत्रांची प्रत देण्यासाठी पोलिसांना विनंती केली आहे.