Drugs Case: आयलेंसच्या कव्हरमध्ये लपवले होते कोकीन, आर्यन खानकडे या गोष्टी सापडल्या

NCB च्या उच्च सूत्रांकडून कळले आहे की, मुंबईत होणाऱ्या रेव्ह पार्टीची माहिती विभागाला आधीच मिळाली होती. गेल्या 15 दिवसांपासून NCB टीम या ऑपरेशनची तयारी करत होती.

Updated: Oct 3, 2021, 07:05 PM IST
Drugs Case: आयलेंसच्या कव्हरमध्ये लपवले होते कोकीन, आर्यन खानकडे या गोष्टी सापडल्या title=

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) शनिवारी मुंबईत सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर छापा टाकला, त्यानंतर 8 लोकांना ताब्यात घेण्यात आले. रविवारी दुपारपर्यंत यातील 3 जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनचाही समावेश आहे. दरम्यान, एनसीबीच्या शीर्ष सूत्रांनी उघड केले आहे की पार्टीतील एका आरोपीने ड्रग्स पकडले जावू नये म्हणून लेन्सच्या आवरणाखाली लपवलेले कोकेन आणले होते.

15 दिवसांपासून छाप्याची तयारी सुरू होती

NCB च्या उच्च सूत्रांकडून कळले आहे की, मुंबईत होणाऱ्या रेव्ह पार्टीची माहिती विभागाला आधीच मिळाली होती. गेल्या 15 दिवसांपासून NCB टीम या ऑपरेशनची तयारी करत होती. शनिवारी सकाळी 20 ते 22 अधिकाऱ्यांचे पथक सर्च वॉरंट घेऊन एनसीबी कार्यालयातून निघाले. सर्व अधिकारी साध्या वेशात होते, त्यामुळे ते कोणत्याही अडचणीशिवाय आणि शंका येणार नाही असे पार्टीत सहभागी झाले. पण पार्टी सुरू होण्याआधीच एनसीबीने तपास सुरू केला. अधिकाऱ्यांनी सर्वांना खोलीत नेले आणि तेथे त्यांची कसून झडती घेण्यात आली. या दरम्यान, 8 लोकांकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले, त्यानंतर सर्वांना ताब्यात घेण्यात आले.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नावही या 8 लोकांमध्ये समाविष्ट आहे. एनसीबीने प्रथम या सर्वांची चौकशी केली आणि त्यानंतर रविवारी दुपारी आर्यनसह 3 आरोपींना प्रतिबंधित पदार्थांचे सेवन, विक्री आणि खरेदीमध्ये गुंतल्याच्या आरोपाखाली अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनकडून 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या 22 गोळ्या याशिवाय 1.33 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सर्व आरोपींना सायंकाळी साडेसहा वाजता मुंबईच्या हॉलिडे कोर्टात हजर केले जाईल.