सिद्धीविनायकाच्या चरणी ३५ किलो सोनं दान

 मंदिराचा घुमट आणि दरवाज्याला सोन्याचा मुलामा 

Updated: Jan 20, 2020, 04:26 PM IST
सिद्धीविनायकाच्या चरणी ३५ किलो सोनं दान title=

मुंबई : सिद्धीविनायकाच्या चरणी एका भक्तानं ३५ किलो सोनं दान केलं आहे. त्यातून मंदिराचा घुमट आणि दरवाज्याला सोन्याचा मुलामा दिला जातो आहे. सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टनं ३५ किलो सोनं देणाऱ्या दानशूर भक्ताचं नाव सांगण्यास नकार दिलाय. या सोन्याची किंमत १४ कोटी एवढी आहे. रोज अनेक भक्त श्री सिद्धिविनायकाच्या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे रोज सिद्धिविनायकाच्या चरणी दान करणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे.

श्री सिद्धीविनायकाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकं मोठं सोनं दान म्हणून आलं आहे. अशी माहिती सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे.

सिद्धीविनायकाचा घुमट सोन्यानं मडविण्यासाठी सिद्धिविनायक मंदिर १९ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आलं होतं. गणपती बाप्पाच्या मूर्तीवर शेंदूर लेपन ही करण्यात आलं आहे. २० जानेवारीपासून बाप्पाचं दर्शन भक्तांसाठी खूल करण्यात आलं आहे.

दानमध्ये ३५ किलो सोनं मिळाल्यामुळे सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचं उत्पन्न वाढलं आहे. अनेक बॉलिवूड कलाकार असो किंवा राजकारणी असो. प्रत्येक जण सिद्धीविनायकाच्या चरणी येत असतात. इतकंच नाही तर परदेशातून ही येथे दर्शनसाठी येणाऱ्या भक्तांची संख्या अधिक आहे.

२५ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान मंदिरात माघी गणेशोत्सव सोहळा पार पडणार आहे. यासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे.