जाहिरात जगतात DNA चा नवा प्रयोग, फोटो भासतील LIVE

इंग्रजी वृत्तपत्र 'डीएनए'ने एक नवा आणि वेगळा प्रयोग केलाय. 

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 17, 2018, 07:38 AM IST
जाहिरात जगतात DNA चा नवा प्रयोग, फोटो भासतील LIVE title=

मुंबई : इंग्रजी वृत्तपत्र 'डीएनए'ने एक नवा आणि वेगळा प्रयोग केलाय. 'डीएनए'ने अशी जाहिरात रिलीज केली आहे की, ज्यामुळे वाचकांना फोटो लाईव्ह असल्यासारखा वाटेल. रिडर ऑगमेंटेड तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लाईव्ह वाटणारे हे फोटो 'डीएनए'ने वाचकांपर्यंत आणले आहेत. 'डीएनए'चा हा प्रभावी आणि रचनात्मक प्रयोग वाचकांना,  'डीएनए' ऑगमेंट रिअॅलिटी अॅपच्या माध्यामातून पाहायला मिळणार आहे. यामुळे जाहिरातदार प्रभावित होणार आहेत. तसेच जाहिरातदार देखील आकर्षित होणार आहेत. कारण यामुळे जाहिरातदारांना त्यांच्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत, हे तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचवणार आहे. या नव्या तंत्रज्ञानाची ओढ सर्वांना लागली आहे.

जाहिरात पाहण्यास तंत्रज्ञान आकर्षित करतं

अमेरिकेत मागील वर्षी झालेल्या व्हायब्रेंट मीडिया पोलमध्ये ८० टक्के लोकांनी म्हटलंय की, हे तंत्रज्ञान जाहिरात पाहण्यास आकर्षित करतं. जास्तच जास्त वाचक ही जाहिरात पाहतात. या तंत्रज्ञानामुळे वाचक जाहिरातीच्या फारजवळ जातात. वेरीजॉन कंपनीची मालकी असलेली कंपनी ओथ आहे, ज्यांच्या ब्रॅन्डमध्ये एओएल आणि याहू सामिल आहे. त्यांनी देखील या प्रकारची ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) अॅड फॉरेमेटचा वापर करण्यात आला आहे.

'नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर'

 'डीएनए'चे सीईओ संजय गर्ग यांनी म्हटलंय की, आपली संस्था नेहमीच नवनवीन आणि सर्वात आधी तंत्रज्ञान आणते. आपण नेहमीच असे प्रयत्न आपले जाहिरातदार आणि वाचकांसाठी करतो. प्रिन्ट आणि डिजिटलला एक मोठ्या काळापासून आखलेली रणनीती आहे. यामुळे आपण नव्या, आधुनिक काळातील ग्राहकांना, आणि आपल्या भागीदारांमधील अंतर कमी करू शकू.