मुंबई : मुंबईतल्या धारावीत एका तरुणीनं भरधाव कारनं तब्बल आठ जणांना उडवल्याची घटना घडली आहे. १९ वर्षांच्या धृवी जैन या मुलीनं मंगळवारी संध्याकाळी धारावीच्या टी जंक्शनजवळ ब्रेकऐवजी कारचा अॅक्सिलेटरच दाबला. त्यामुळे कार नियंत्रणात येण्याऐवजी रस्त्यावर बेसावध असलेल्या तब्बल आठ लोकांना उडवून धरधाव वेगानं पुढं गेली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.
जखमींमध्ये पादचारी महिला, बाईक चालक आणि रिक्षा चालकांचा समावेश आहे. तर धृवी जैन या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.