Doctor Bride Shocking death : लगीन घटिका समीप आली,करा हो लगीन घाई...लग्नघरात धावपळ सुरु असते. पत्रिका वाटून झाल्या होत्या, नवरीला मेहंदी लागली आणि हदळीचा दिवस...नवरीबाईचा (Bride ) माहेरचा आज शेवटचा दिवस...मग काय ती भावूक होते उद्यापासून आयु्ष्याला नवीन सुरुवात आणि तीही नवीन लोकांसोबत नवी घरात. पण या नवरीने कधी विचारही केला नसेल माहेरचा हा शेवटचा दिवस तिच्यासाठी आयुष्याचा शेवटचा दिवस ठरेल. ज्या घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं तिथे क्षणात भयान शांतता पसरते.
हळदीचा (Turmeric) दिवशी नवरीबाई नाश्तामध्ये ढोकळा (Dhokla) खाते आणि तो अचानक तिच्या घशात अडकतो. म्हणून ती पाणी पिते त्यामुळे तिला ठसका लागतो...बऱ्याच वेळ तिला खोकला येतो. काही केला तो थांब नाही आणि तिची प्रकृती बिघडते. तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात येतं. पण तिथे तिचा जीव जातो. ज्या मुलीला सासरी पाठवणी करायची असते तिथे आई-वडिलांना तिच्या अंत्यसंस्काराची वेळ येतं. आनंदाने भरलेल्या घरात क्षणामध्ये दु:खाचं डोंगर कोसळतं.
ती स्वत: डॉक्टर (Doctor) असून तिचा असा अंत होणे यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. मेघा काळे (megha kale) असं तरुणीचं नाव होतं. मुंबईत तिने MBBS चं शिक्षण पूर्ण केलं होतं. मुंबईतच (Mumbai) ती प्रॅक्टिसही करत होती. लग्नासाठी म्हणून ती आपल्या गावी छिंडवाडाला (Chhindwara) गेली होती. मात्र एक ढोकळा तिच्यासाठी जीवघेणा ठरला.