मुंबई : विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री यांनी पुन्हा एकदा महाविकासआघाडीवर टीका केली आहे. निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्ह्याचं जे नुकसान झालं त्याकर जाहीर केलेली १०० कोटींची मदत ही तोकडी आहे. नुकसान प्रचंड मोठं आहे, तेव्हा आणखी मदत करणे आवश्यक असल्याचं यावेळी फडणवीसांनी सांगितलं.
गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात पूर आला तेव्हा कोकणात - नाशिकमध्येही नुकसान झालं होतो. तेव्हा आम्ही विशेष जीआर काढून एनडीआरएफ पेक्षा जास्त मदत देण्याचे निर्णय घेतले होते.
सांगली - कोल्हापूरसाठी आपण ४७०८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं होतं. कोकण नाशिक करता २१०५ कोटी रुपयांचे पॅकेज दिलं होतं. आताच्या सरकारनेही अशीच मदत जाहीर करणे आवश्यक आहे.
छोटे व्यवसायिक ,बारा बलुतेदार यांच्यासाठी मदत आम्ही सत्तेत असतांना जाहीर केली होती. घर नुकसानबाबत एनडीआरएफचे येणारे पैसे आणि वेगळी मदत अशी जाहीर केली होती. तसेच ३ पटीने पैसे वाढवून मदत जाहीर केली होती, शेतकऱ्यांचे चालू कर्ज माफ केलं करण्याचा निर्णय आम्ही गेल्या वर्षी घेतला होता, असं सांगत फडणवीसांना तुलना केली आहे.
मोदी सरकारला आता दोन वर्षे झाले आहेत. मोदी सरकारने गेल्या वर्षभरात कठोर निर्णय घेतले आहेत. जे आयुष्यात कधी पाहू शकलो नसतो असे निर्णय पंतप्रधान यांनी घेतले.
Interacting with the media via video conferencing.
Posted by Devendra Fadnavis on Saturday, June 6, 2020
३७० कलम रद्द करणे हा महत्त्वाचा निर्णय यापैकी आहे. यामुळे या भागात आमूलाग्र बदल होत आहे. CAA मध्ये सुधारणा करत निर्णय घेतला.
रोखीने पैसे देण्याचा निर्णय गेल्या वर्षी आलेल्या पुराच्या वेळी केला होता. तेव्हा चक्रीवादळ नुकसानबाबत अशीच मदत राज्य सरकारने तातडीने करावी. इन्फ्रास्ट्रक्चरचे नुकसान झालेले आहे त्याबाबत अतिरिक्त मदत केली पाहिजे. १०० कोटी रुपयांची मदत ही फारच तोकडी आहे.
ट्रिपल तलाक वर बंदीचा निर्णय मोदी सरकारने घेतला. करतापूर कॉरिडॉर, बोडो बाबत निर्णय, राफेल निर्णय, आयुष्यमान भारत मध्ये एक कोटी लोकांना लाभ मिळत आहे, प्रधानमंत्री किसान योजना असे निर्णय घेतले. असं सांगत फडणवीसांनी मोदी सरकारचं गुणगान गायलं आहे.