राज्यातील तरुणांना वर्षभरात 75 हजार रोजगार, सरकारचा महासंकल्प

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) बेरोजगारांना अनोखं गिफ्ट दिलंय.

Updated: Nov 3, 2022, 11:59 PM IST
राज्यातील तरुणांना वर्षभरात 75 हजार रोजगार,  सरकारचा महासंकल्प title=

Job News :  एकीकडं महाराष्ट्रातून (Maharashtra) मोठमोठे उद्योग (Projects) परराज्यात जातायत. बेरोजगार तरुणांच्या रोजगाराच्या (Employment) संधी कमी होतायत. अशातच शिंदे फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारनं मोठी घोषणा केलीय. वर्षभरात राज्यात 75 हजार रोजगार उपलब्ध करून देण्याचा महासंकल्प शिंदे-फडणवीस (Maharashtra Government) सरकारनं जाहीर केलाय.  (dcm devendra fadnavis said that he will soon advertise for 10 thousand seats in the rural development department)

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र सरकारनं बेरोजगारांना अनोखं गिफ्ट दिलंय. येत्या वर्षभरात 75 हजार जागा भरण्याची घोषणा करण्यात आलीय... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महासंकल्प रोजगार मेळाव्याची सुरूवात झाली. यावेळी 2 हजार लोकांना नियुक्तीपत्रं देण्यात आली. ग्रामविकास खात्यातर्फे 10 हजार, तर गृह खात्यातर्फे 18 हजार पोलिसांच्या भरतीसाठी लवकरच जाहिरात काढण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

राज्यात नोकरभरती प्रक्रियेसाठी TCS आणि IBPS अशा दोन एजन्सी नेमण्यात आल्यात. या एजन्सी भरतीसाठीच्या प्रवेश परीक्षा घेणार आहेत. पारदर्शक पद्धतीनं भरती करण्याचं धोरण सरकारनं स्पष्ट केलंय... मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा केल्या जातायत, अशी टीका विरोधी पक्षाने केलीय.

एकीकडं राज्यातले मोठमोठे उद्योग महाराष्ट्राबाहेर चाललेत. त्यामुळं बेरोजगार तरुणांच्या रोजगाराच्या संधी कमी झाल्याची टीका होतेय. अशावेळी 75 हजार नोकरभरतीची घोषणा हा बेरोजगारांना मोठा दिलासा आहे. फक्त ही घोषणा लवकरात लवकर अमलात यावी आणि बेरोजगार हातांना काम मिळावं, एवढीच अपेक्षा.