दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट, १८ गोविंदा जखमी

 यंदाही दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागलाय. मुंबईत सकाळपासून दहीहंडी फोडताना आतापर्यंत १८ गोविंदा जखमी झाले आहेत.  

Updated: Aug 15, 2017, 03:46 PM IST
दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट, १८ गोविंदा जखमी  title=

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागलाय. मुंबईत सकाळपासून दहीहंडी फोडताना आतापर्यंत १८ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 सायन रुग्णालयात ५  गोविंदांना दाखल करण्यात आलं असून त्यांच्या डोक्याला दुखापत झालीय. तर केईएम रुग्णालयात दाखल केलेल्या सात गोविंदांपैकी तिघांची प्रकृती स्थिर आहे. तर राजावाडी रुग्णालयात तीन जणांना दाखल करण्यात आले आहे.

 माँ रुग्णालयात एकाला दाखल कऱण्यात आलंय तर के इ एम रुग्णालयात सकाळपासून अनेक गोविंदावर उपचार सुरु असून अनेकांना उपचार करुन घरी सोडून देण्यात आले आहे.