मुंबई : कोरोना व्हायरसचा एकंदर वाढता प्रादुर्भाव पाहता, सध्याच्या घडीला संपूर्ण देश या वैश्विक महामारीचा सामना करत आहे. याच परिस्थितीत आता देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये सावट आहे ते म्हणजे एका वादळाचं. मुंबईसह नजीकच्या अलिबाग आणि कोकण किनारपट्टीवर Cyclone Nisarg निसर्ग नावाचं चक्रीवादळ धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. त्याच पार्श्भूमीवर रत्नागिरीपासून, अलिबाग, मुंबई आणि गुजरातच्या किनारी भागात या वादळाचे पडसाद उमटत असल्याचं पाहायला मिळालं.
वादळाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातही हवामानात काही महत्त्वाचे बदल झाल्याचं पाहायला मिळालं. तर, रत्नागिरीमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळं मोठ्या प्रमाणात वादळी वारे घोंगावत असल्याचं चित्र धडकी भरवून गेलं.
CycloneNisarg : 'निसर्ग' धडकल्यास संकटसमयी काय करावं आणि काय करु नये?
एएनआय या वृत्तसंस्थेनं विविध ठिकाणी या चक्रीवादळामुळं नेमकी काय परिस्थिती उदभवली आहे, याचे व्हिडिओ पोस्ट केले. ज्या माध्यमातून वादळाची नेमकी तीव्रता अनेकांच्या लक्षात आली. वाऱ्याचाएकंदर वेग पाहता रत्नागिरीमध्ये मोठमोठे आणि उंच वृक्षही हेलकावे खात असल्याचं दिसून आलं. तर, अलिबागमध्ये समुद्र चांगलाच खवळलेल्याचं दिसून आलं.
#WATCH Maharashtra: Strong winds and rain hit North Ratnagiri area. #CycloneNisarga pic.twitter.com/AhvTeTr01P
— ANI (@ANI) June 3, 2020
#WATCH Gujarat: NDRF (National Disaster Response Force) team has been deployed at Suvali Beach in Surat, in view of impending adverse weather. #CycloneNisarga pic.twitter.com/Ehv5rauRCS
— ANI (@ANI) June 3, 2020
Goa: Rain lashes parts of Panaji city.
India Meteorological Department (IMD) has predicted light to moderate rainfall for today at most places with heavy to very heavy falls at isolated places over Goa. #CycloneNisarga pic.twitter.com/gXucYckxk8
— ANI (@ANI) June 3, 2020
#WATCH: Strong winds and high tides hit Versova Beach in Mumbai. As per IMD,#NisargaCyclone is likely cross south of Alibag (Raigad) between 1pm to 3pm today. pic.twitter.com/xwKhcu5Xyd
— ANI (@ANI) June 3, 2020
#WATCH Cyclone Nisarga has become a severe cyclonic storm, it's 200km away from Mumbai. The cyclone is moving northeasterly towards Alibag in Raigad. The severe cyclonic storm is likely to cross south of Alibag between 1 pm to 3pm:IMD Mumbai,Maharashtra; Visuals from Alibag Beach pic.twitter.com/P2GfsecdNr
— ANI (@ANI) June 3, 2020
#WATCH Maharashtra: Strong winds and rain hit Ratnagiri area. #CycloneNisarga
As per, Ratnagiri recorded 59 kmph at 09:30 IST. Gale wind reaching 60-70 kmph gusting to 80 kmph prevails along&off South Konkan coast&50-60 kmph gusting to 70 kmph along&off North Konkan coast. pic.twitter.com/s3LMJQZIoR
— ANI (@ANI) June 3, 2020
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशाराही देण्यात आला. समुद्राला आलेलं उधाण, वादळी वारे आणि विविध ठिकाणी तैनात करण्यात आलेली एनडीआरएफची पथकं पाहता 'निसर्ग'चं रौद्र रुप धडकी भरवणारं आहे, असं म्हणायला हरकत नाही.