मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. फडणवीस यांच्या कार्यालयातील निकटच्या सर्व सहकाऱ्यांची चाचणी negative आली आहे. फडणवीसांनी स्वतः ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असं देखील या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे.
'लॉकडाऊन झाल्यापासून मी दररोज काम करत आहे परंतु आता असे दिसते की, मी स्वतः थोडावेळ थांबावे आणि थोडा वेळ स्वतःसाठी घ्यावा अशी देवाची इच्छा आहे!' त्यामुळे कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे मी काळजी घेत आहे. देवेंद्र फडणवीस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सगळी औषधे घेत असून आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना चाचणी करण्याची विनंती केली
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी.
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 24, 2020
माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी.
सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी !— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 24, 2020
देवेंद्र फडणवीस यांनी काहीच दिवसांपूर्वी सोलापूर दौरा केला होता. पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली होती.