मुंबईकरांना दिलासा! रुग्णसंख्येत मोठी घट, पाहा आकडेवारी

मुंबईकरांना दिलासा! रुग्णसंख्येत मोठी घट, पाहा आजची ताजी आकडेवारी

Updated: Jan 10, 2022, 09:24 PM IST
मुंबईकरांना दिलासा! रुग्णसंख्येत मोठी घट, पाहा आकडेवारी  title=

मुंबई : राज्यातील कोरोनाची आकडेवारी आली आहे. मुंबईमध्ये आज कोरोनाची रुग्णसंख्या कालच्या तुलनेत कमी आढळली आहे. त्यामुळे काहिसा दिलासा म्हणायला हरकत नाही. मात्र तरीही काळजी घेणं आणि निर्बंध पाळणं आवश्यक आहे. 

मुंबईमध्ये 13 हजार 648 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर हा 37 टक्के आहे. तर रुग्ण कोरोनातून बरे होण्याचा दर 87 टक्के असल्याने ही दिलासादायक गोष्ट म्हणायला हवी. 

मुंबईतील 27 हजार 214 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मुंबईतील 59,242 लोकांचा चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 13 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

मुंबईमध्ये 9 जानेवारी रोजी  19 हजार 474 कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तर 8 हजार 63 जण कोरोनामुक्त झाले होते. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या कमी असणं ही खूप चांगली गोष्ट मानायला हवी.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. शिवाय मास्क सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असल्याचं महापौरांनी सांगितलं आहे. शाळाही ऑनलाइन सुरू करण्यात आल्या आहेत.