मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाने कहर केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय, तर मृत्यूचं प्रमाणंही वाढतंय, एकंदरीत आता ग्रामीण आणि निमशासकीय भागातही कोरोना आटोक्यात कसा आणता येईल याकडे सरकारला लक्ष्य द्यावं लागणार आहे.
जळगाव कोरोना अपडेट
जळगाव जिल्ह्यात आज ८०१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. जळगाव जिल्ह्याची एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली २८ हजार ९३३ आहे. आज दिवसभरात ०९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची संख्या ८३१ झाली आहे.
तसेच आज दिवसभरात ५६२ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, एकूण कोरोना मुक्त झालेल्या संख्या २० हजार ८३० झाली आहे.
-------------
लातूर जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ०९ बळी गेले आहेत. कोरोना बळींचा आकडा २८८ वर गेला आहे. तर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आलेख ०८ हजार ४२७ आहे. आज जिल्ह्यात ३१५ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले, यात अॅक्टिव्ह रुग्ण १८६१ आहेत, तर रुग्ण ६२७८ बरे झाले आहेत.
-----------
नाशिकमधील येवल्यात कोरोना बाधित ८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आतापर्यंत २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. येवल्यातील कोरोना बधितांची एकूण संख्या पोहचली ३८३ वर पोहोचली आहे. कोरोनावर २८४ जणांनी मात करत घरवापसी केली आहे.उर्वरित ७१ जण कोरोनाचा उपचार घेत आहेत. सद्यस्थितीत ७ हजार ७७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
------------
नागपुरात आज 1703 नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवसातील नागपुरातली उच्चांकी वाढ आहे. नागपुरात आज कोरोनाने घेतला ४१ जणांचा बळी गेला आहे. नागपुरात आतपर्यंत 32,705 पॉझिटीव्ह झाले ,तर 21,656 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
------------
रायगड जिल्ह्यात आजवरची सर्वात मोठी वाढ झाली आहे. आज दिवसभरात कोरोना 670 रुग्ण आढळले आहेत. गणेशोत्सवानंतर रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे.
आतापर्यंत कोरोनाबाधित एकूण रूग्ण 28 हजार 692 आहेत. यात आज दिवसभरात 477 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण रूग्ण 23 हजार 929 रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोनामुळे आज दिवसभरात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृत्यू झालेली संख्या 839 वर आहे.
आज दिवसभरात सापडलेल्या रूग्णांचा तपशील....
पनवेल शहर 226 , पनवेल ग्रामीण 81 , उरण 31, खालापूर 30 , कर्जत 21 , पेण 29 , अलिबाग 91 , माणगाव 49 , रोहा 53 , महाड 16 , मुरूड 07 , सुधागड 19 , श्रीवर्धन 07 , पोलादपूर 03 , म्हसळा 01 , तळा 06.
-----------
हिंगोली- दिवसभरात 32 जणांना कोरोनाची लागण झाली. यात 27 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत 1 हजार 545 जण कोरोनाग्रस्त झाले आहेत. 192 रुग्णांवर उपचार सुरू/एकूण 20 जण कोरोनाने दगावले
------------
जालना जिल्ह्यात आज कोरोनाचे 129 नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 4 हजार 937 वर आहे. आतापर्यंत 3 हजार 596 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1 हजार 193 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 148 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
----------
नांदेड जिल्ह्यात आज तब्बल 380 जण नव्याने कोरोनाबाधित आढळले, 24 तासात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 243 मृत्यू झाला, तर एकूण रुग्णसंख्या 7407 आहे, तर त्यात अॅक्टिव्ह 2337 रुग्ण आहेत.