सावधान! 'कोरोनाची तिसरी लाट आली आहे' महापौर किशोरी पेडणेकर यांचा इशारा

मुंबईत गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे

Updated: Sep 7, 2021, 08:00 PM IST
सावधान! 'कोरोनाची तिसरी लाट आली आहे' महापौर किशोरी पेडणेकर यांचा इशारा title=

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमवीर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबईत कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave In Mumbai) तिसरी लाट येणार नाही, तर आली आहे असं महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी म्हटलं आहे. किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या इशारामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. 

महापौरांचं नागरिकांना आवाहन

गणेशोत्सव येत असून यात लोकांनी हा सण घरीच साजरा करावा, मी सुद्धा माझ्या घरी गणपती बसवणार असून गणेशोत्सव घरीच साजरा करणार आहे, लोकांनीही नियमांची काळजी घ्यावी असं आवाहन महापौर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे. 

मुंबईत वाढती रुग्णसंख्या

मुंबईत (mumbai) दोनशेच्या खाली आलेली रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात पुन्हा वाढू लागली आहे. मुंबईत सोमवारी 379 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली होती. तर 477 रुग्णांनी करोनावर मात केल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. मुंबईत आतापर्यंत 7 लाख 24 हजार 494 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्के आहे. तर 3 हजार 771 सक्रिय रुग्ण आहेत. 

नागपूरमध्ये तिसरी लाट?

नागपूरमध्ये (nagpur) कोरोनाची तिसरी लाट आल्याचे संकेत राज्याचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. सलग दोन दिवस शहरात आढळणाऱ्या संसर्गाच्या संख्येमुळे त्यांनी हे सांगितलं आहे. कोविड -19 साथीच्या आधीच्या दोन्ही लाटांमध्ये महाराष्ट्र हे सर्वाधिक प्रभावित राज्य होते.