मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 157 दिवसांवर

मुंबईकर आणि बीएमसीला मोठा दिलासा...

Updated: Oct 30, 2020, 07:30 PM IST
मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 157 दिवसांवर  title=

कृष्णात पाटील, मुंबई : मुंबईकरांना आणि प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण मुंबईतील कोरोना रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 10 दिवसांत 100 दिवसांवरून दिडशे दिवसांवर गेला आहे. मुंबईत केवळ 10 दिवसांत रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी तब्बल 57 दिवसांनी वाढून 100 दिवसांवरून 157 दिवसांवर पोहोचला आहे. 20 ऑक्टोबर रोजी मुंबईने रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधीचा 100 दिवसांचा टप्पा ओलांडला होता. 

विशेष म्हणजे एफ दक्षिण विभाग जसा रूग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचा 200 दिवसांचा टप्पा ओलांडणारा पहिला विभाग ठरला होता, तो लौकिक कायम ठेवत या विभागाने 300 दिवसांचाही टप्पा ओलांडला असून हा विभाग आता 362 दिवसांवर पोहोचला आहे. 

या पाठोपाठ बी, जी दक्षिण, ए विभागांनीही 200 दिवसांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या बी विभाग 232 दिवस, जी दक्षिण 231 दिवस, ए 212 दिवस असा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आहे. 

इतर विभागांचा तपशील

300 दिवसांपेक्षा जास्त - 1 विभाग - एफ दक्षिण 
200 दिवसांपेक्षा जास्त - 3 विभाग बी,जी दक्षिण, ए  
176 ते 199 दिवस - 4 विभाग ( जी उत्तर, ई, एस, एम पूर्व )
151 ते  175 दिवस - 7 विभाग ( के पूर्व, एफ उत्तर, आर उत्तर, टी,एन,डी, एच पूर्व)
126 ते 150 दिवस - 7 विभाग ( एल, पी उत्तर , एच पश्चिम,एम पश्चिम, सी,  पी दक्षिण, आर मध्य)
106 ते  125 दिवस - 3 विभाग ( आर मध्य ,  आर दक्षिण के पश्चिम )

टप्पे

100 दिवस - 20 ऑक्टोबर 
126 दिवस - 24 ऑक्टोबर 
150 दिवस - 29 ऑक्टोबर

मुंबईत रूग्ण दुप्पट होण्याचा सर्वात जास्त कालावधी असलेले 5 विभाग आहेत.

एफ दक्षिण - 362 दिवस  
बी - 232 दिवस 
जी दक्षिण - 231 दिवस 
ए - 212 दिवस 
जी उत्तर - 198 दिवस

मुंबईत रूग्ण दुप्पट होण्याचा सर्वात कमी कालावधी असलेले 5 विभाग

सी  - 130 दिवस 
पी दक्षिण - 129 दिवस  
आर मध्य - 128 दिवस 
आर दक्षिण - 124 दिवस
के पश्चिम - 120 दिवस

रुग्ण वाढीचा सरासरी दरही या 10 दिवसांत 0.25 % ने कमी झालेला आहे. 20 ऑक्टोबरला हा दर 0.69% होता तो आता 0.44% एवढा खाली घसरला आहे.