मोठी बातमी: साकीनाका झोपडपट्टीत कोरोनाचा रुग्ण; मरकज कनेक्शन उघड

असल्यास मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर वाढण्याची भीती आहे. 

Updated: Apr 5, 2020, 12:59 PM IST
मोठी बातमी: साकीनाका झोपडपट्टीत कोरोनाचा रुग्ण; मरकज कनेक्शन उघड title=

मुंबई: मुंबईच्या साकीनाका परिसरात रविवारी कोरोनाचा रुग्ण सापडला. हा रुग्ण दिल्लीच्या मरकजमधून परतला होता. त्यामुळे या व्यक्तीची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. रविवारी या टेस्टचा निकाल समोर आला असून यामध्ये संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती साकीनाका परिसरात राहणारे काँग्रेस नेते नसीम खान यांनी दिली. 

त्यामुळे आता मुंबईतील कोरोनाचा धोका आणखीनच वाढला आहे. साकीनाका झोपडपट्टीचा परिसर हा अत्यंत दाटीवाटीचा आहे. कुर्ला परिसरही या भागाला लागूनच आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या संपर्कातून इतरांना संसर्ग झाला असल्यास मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर वाढण्याची भीती आहे. कुर्ल्यातील जरीमरीचा परिसर यापूर्वीच पालिकेकडून सील करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्याला जावेद अख्तरांचा सलाम

दरम्यान, नवी मुंबईतही मरकज कनेक्शन असणाऱ्या १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये फिलिपाईन्सच्या तीन नागरिकांचा समावेश आहे. हे सर्वजण दिल्लीच्या निझामुद्दीन येथील मरकजमध्ये झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. काही दिवसांपूर्वीच ते नवी मुंबईत परतले होते. याठिकाणी ते एका मशिदीत राहत होते.

पाकिस्तानकडून एअर इंडियाच्या पाठीवर शाबासकीची थाप

मात्र, पोलिसांच्या सूचनेनंतरही ते स्वत:हून क्वारंटाईन झाले नव्हते. हे सर्वजण मशिदीत नमाज पढण्यासाठी येणाऱ्या लोकांमध्ये मिसळत होते. त्यामुळे आणखी २१ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. दरम्यान, मरकजहून परतलेल्या एका फिलिपाईन्सच्या नागरिकाचा नुकताच मृत्यू झाला. यानंतर हा सर्व प्रकार समोर आला होता. याप्रकरणी पोलिसांनी मरकजमधून परतलेल्या १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.