मुंबई, नवी मुंबईत कोरोनाचा विस्फोट, पुण्यात ही परिस्थिती चिंताजनक

मुंबईत आज 10 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Updated: Jan 4, 2022, 08:15 PM IST
मुंबई, नवी मुंबईत कोरोनाचा विस्फोट, पुण्यात ही परिस्थिती चिंताजनक title=

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. मुंबईत ही कोरोना व्हायरस (Mumbai Coronvirus) चे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. आज मुंबईत 10 हजार 860 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत जर दररोज 20 हजाराहून अधिक रुग्ण वाढू लागले तर लॉकडाऊनचा विचार केला जाईल असा इशारा याआधीच महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. कोरोना वाढीचा दर पाहता मुंबईत लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मुंबईसह राज्यात देखील कोरोना रुग्ण वाढत आहेत. आज पुण्यात 6800 पैकी 1104 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रुग्णवाढीचा दर 18 टक्के झालाय.

पिंपरी चिंचवड मध्ये ही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. आज दिवसभरात 350 नवे कोरोना रुग्ण आढळले असून एक नवा ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे.

रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ पाहायला मिळतेय. जिल्ह्यात दिवसभरात 702 नवे रुग्ण वाढले असून पनवेल शहरात सर्वाधिक 521 रुगणांची नोंद झालीये. तर दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झालाय.

नवी मुंबईत कोरोनाचा विस्फोट झाला आहे. एका दिवसात 1072 कोरोना रुग्ण वाढलेत. गेल्या काही महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झालीये.