काँग्रेस नेते बाबासाहेब धाबेकर यांचे निधन

काँग्रेस नेते बाबासाहेब धाबेकर यांचे निधन झाले आहे.

Updated: Nov 5, 2019, 05:45 PM IST
काँग्रेस नेते बाबासाहेब धाबेकर यांचे निधन  title=

मुंबई : काँग्रेस नेते बाबासाहेब धाबेकर यांचे निधन झाले आहे. ते ९० वर्षांचे होते. बाबासाहेब धाबेकर हे माजी राज्यमंत्री होते. मुंबईत उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. यानंतर त्यांचे कुटुंब आणि काँग्रेस नेत्यांवर शोककळा पसरली आहे. काँग्रेसचे महत्त्वाचे नेते धाबेकर यांच्या घरी सांत्वनासाठी जात आहेत.

ग्रामपंचायत सदस्य ते केबिनेट मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास होता. अकोला जिल्हा परिषदेचे सलग १५ वर्षे अध्यक्ष असलेले बाबासाहेब धाबेकार महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात राज्य परिवहन मंत्री आणि जलसंधारण मंत्री असे २ वेळा मंत्री होते..तर सलग तीन वेळा ते आमदारही होते.

2009 ची लोकसभा निवडणूक त्यांनी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या विरुद्ध लढली होती.

राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांच्या जवळ असलेले बाबासाहेब धाबेकर अभ्यासू नेता होते सोबतच सहकार क्षेत्रात सुद्धा त्यांचा मोठा वजन होता.

त्यांच्या मागे पत्नी, २ पुत्र आणि मोठा आप्त परिवार आहे. उद्या बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा त्यांच्या या मूळगावी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे