मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष भाई जगताप

काँग्रेसचे (Congress) कामगार नेते भाई जगताप ( Bhai Jagtap) हे आता मुंबई काँग्रेसचे (Mumbai Congress) नवे अध्यक्ष असणार आहेत.  

Updated: Dec 19, 2020, 10:40 PM IST
मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष भाई जगताप  title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) कामगार नेते भाई जगताप ( Bhai Jagtap) हे आता मुंबई काँग्रेसचे (Mumbai Congress)नवे अध्यक्ष असणार आहेत. तर चरणसिंह सप्रा (Charan Singh Sapra ) यांच्याकडे मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्षपद असणार आहे. आगामी मुंबई महापालिका (Mumbai Corporation) निवडणुकीला वर्ष राहिले असताना मुंबई काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या नव्या कार्यकारिणीला मंजुरी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजी होती. त्यामुळे हा नवा बदल करण्यात आला आहे.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक जणांची लॉबिंग सुरु होते. यामध्ये वर्षा गायकवाड, मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, अस्लम शेख यांचा समावेश होता. मात्र, भाई जगताप यांनी बाजी मारली आहे. असे असले तरी अन्य इच्छुकांनाही कार्यकारणीत स्थान देऊन त्यांचे समाधान करण्यात आले आहे.

प्रचार समितीचे, अध्यक्ष म्हणून मोहम्मद आरिफ नसिम खान,  समन्वय समिती, अध्यक्ष म्हणून अमरजितसिंह मनहास, तर जाहीरनामा आणि प्रकाशन समिती अध्यक्ष सुरेश शेट्टी यांना स्थान देण्यात आले आहे. मुंबईचे प्रभारी म्हणून चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे कामगिरी सोपविण्यात आली आहे. तपासणी आणि रणनीती समिती, सचिव म्हणून गणेश यादव यांची नियुक्ती केली आहे. तर माजी खासादार प्रिया दत्त, अमिन पटेल, जनेत डिसुझा, उपेंद्र दोशी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.