डझनभर कोब्रा झाडावर चढण्यासाठी एकमेकांशी भिडले, अंगावर शहारा आणणारा VIDEO

व्हिडिओमध्ये अनेक किंग कोब्रा एका छोट्या झाडावर चढण्यासाठी एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

Updated: May 14, 2022, 07:06 PM IST
डझनभर कोब्रा झाडावर चढण्यासाठी एकमेकांशी भिडले, अंगावर शहारा आणणारा VIDEO title=

King Cobra Fight Video : तुम्ही सोशल मीडियावर सापांशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहिले असतील. साप पाहून भल्याभल्यांची अवस्था बिघडते. साप हा असा प्राणी आहे, जो डसला तर माणसाचा जीवही जाऊ शकतो. साप पाहून बहुतेक लोक पळून जातात. किंग कोब्रा हा सापांमध्ये सर्वात विषारी मानला जातो. अनेक वेळा ते आपापसात भांडणे टाळत नाहीत. सध्या सोशल मीडियावर किंग कोब्राच्या लढाईचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये अनेक किंग कोब्रा एका छोट्या झाडावर चढण्यासाठी एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर शहारे येतील. असा व्हिडिओ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल. 

व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे अनेक किंग कोब्रा एकत्र दिसत आहेत, असे दृश्य सहसा पाहायला मिळत नाही. इन्स्टाग्रामवर snake._.world या अकाऊंटवरून व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SNAKE WORLD (@snake._.world)

एका मोकळ्या मैदानात एक छोटं झाड दिसत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. या झाडाची फांदी पकडण्यासाठी अनेक किंग कोब्रा लढताना दिसतात. हे सर्व किंग कोब्रा एकमेकांना चिकटून बसलेले दिसत आहेत. यादरम्यान ते एकमेकांशी भांडतानाही दिसत आहेत. हा थक्क करणारे दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे दृश्य पाहून सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले असून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.