मुंबई : कोरोना विषाणूच्या महामारीचे संकट कायम आहे. डब्ल्यूएचओने पुढच्या महामारीला सज्ज राहा, असा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल शांततेने टाकले पाहिजे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या सूचना केल्या त्याचे पालन केले. पंतप्रधान यांनी थाळ्या वाजवल्या, दिवे लावले. मात्र, आपण पुनश्च हरी ओम केले. अर्थचक्र सुरू राहण्यासाठी आपण अनेक गोष्टी सुरू केल्या, असा जोरदार चिमटा मुख्यमंत्र्यांनी भाजपला काढला.
मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला धन्यवाद देत आहे, कारण मी सुरुवातीलाच म्हंटले होते की हे संकट म्हणजे विषाणू बरोबरचे आपले युद्ध आहे. या युद्धामध्ये सर्व धर्मीय, सर्व पक्षीय खांद्याला खांदा लावून एकत्रितपणे मैदानात उतरले. pic.twitter.com/H9p0PYPqoM
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 8, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. काम करताना इगो असता काम नये. तसा शॉर्ट कटही मारू नये, असे सांगत तुम्ही रातोरात आरेमघील झाडे तोडली. रात्री चालणारी काम आम्ही दिवसाढवळ्या करत आहोत ,बरोबर ना दादा. (अजित पवार). आरे कार शेडचा जो खर्च झाला तो वाया जाऊ देणार नाही. आरे विभाग हा संपूर्ण परिसर जंगल म्हणूने घोषित केला आहे. शहराच्यामध्ये असे जंगल कुठेच नाही. हे केवळ जंगल नाही इथे जैवविविधता आहे, असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोला लगावला.
WHOने संपूर्ण जगाला इशारा दिला आहे की कोरोनाचे संकट लवकर जाईल असे वाटत नाही, पण इशारा हा आहे की पुढच्या अजून मोठ्या महामारीला अधिक सज्जतेने तयार रहा. याचा अर्थ असा की आपल्याला कुठेही शिथिलता किंबहुना गाफील राहून चालणार नाही, प्रत्येक पाऊल समजूतदारपणे व दक्षतेने टाकावे लागणार आहे. pic.twitter.com/XXzdBGpO0y
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 8, 2020
त्याचवेळी कोरोनाच्या मुद्द्यावर फडणवीस यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. याला उत्तरही मुख्यमंत्री उद्धव यांनी दिलेय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने इशारा दिलाय पुढच्या महामारीला सज्ज राहा. त्यामुळे प्रत्येक पाऊल शांततेने टाकलं पाहिजे. हिमाचल प्रदेशच्या अध्यक्षांनी आपल्या सदस्यांना सांगितले आहे, ओरडून बोलल्याने कोरोना होतो. त्यामुळे पुढच्या अधिवेशनात ही सूचना आपण पाळायला हवी, असा जोरदार टोला फडणवीसांना त्यांनी हाणला.
महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम तज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स आपण निर्माण केला, १५-२० दिवसांत फील्ड हॉस्पिटल निर्माण केले, नंतर जिल्ह्यांमध्ये टास्क फोर्स निर्माण केले. टास्क फोर्स सोबतच कोरोना दक्षता समिती गावागावांमध्ये निर्माण करण्यासाठी मी सूचना केल्या आहेत. pic.twitter.com/dSdjzJawze
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 8, 2020
कोरोनाविरोधात लढा सुरुच आहे. त्यामुळे १५ सप्टेंबरपासून आम्ही एक अभियान सुरू करत आहोत. 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' आरोग्य सेवकांनी प्रत्येक घरात जाऊन १५ दिवसांतून एकदा चौकशी करणे आणि काही आढळलं तर त्यांची काळजी घेणे, उपचार करणे यावर भर देण्यात येणार आहे. हा व्हायरस कुणालाही सोडत नाही. त्यामुळे राज्यात आपल्याला हे अभियान राबवायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणालेत.
डिसेंबरच्या अधिवेशनात शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्तीचं वचन दिलं होतं, जवळपास २९.५ लाख शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त करू शकलो आहोत. तसेच येत्या वर्षभरामध्ये साधारणत: ६.५ लाख आदिवासी आणि कुपोषित बालकांना आपण मोफत दूध भुकटी देणार आहोत. pic.twitter.com/0HXSSqsjLX
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 8, 2020
- १९.५ लाख शेतकर्यांना आपण कर्जमुक्त केलं
- मुंबईतील वनसंपती महत्त्वाची
- तुम्ही रातोरात आरेमघील झाडं तोडली
- आरे कार शेडचा जो खर्च झाला तो वाया जाऊ देणार नाही
- आरे विभाग हा संपूर्ण परिसर जंगल म्हणूज घोषित केले
- १५ सप्टेंबरपासून आम्ही एक अभियान सुरू करतोय
- माझं कुटुंब माझी जबाबदारी
- आरोग्य सेवकांनी प्रत्येक घरात जाऊन १५ दिवसांतून एकदा चौकशी करणे
- काही आढळलं तर त्यांची काळजी घेणे, उपचार करणे
- हा व्हायरस कुणालाही सोडत नाही
- त्यामुळे राज्यात आपल्याला हे अभियान राबवायचे आहे
- प्रत्येक कुटुंबात जाऊन आरोग्यविषयक माहिती घेतली जाईल आणि उपचार केले जातील
- प्रत्येक नागरीकाची चौकशी केली जाईल- यासाठी पथके नेमली जातील
- पुढचे अनेक वर्ष विरोधी पक्षाचे असेच सहकार्य मिळत राहील ही अपेक्षा ठेवतो
- पुढील अधिवेशन ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे