Rajysabha Election : दगाफटका की सुरक्षितता? शिवसेना आमदारांसाठी पक्षाने काढला हा आदेश

राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेना आता हाय अलर्ट मोडवर गेली आहे. 

Updated: Jun 3, 2022, 06:32 PM IST
Rajysabha Election : दगाफटका की सुरक्षितता? शिवसेना आमदारांसाठी पक्षाने काढला हा आदेश title=

मुंबई : राज्यसभेची निवडणूक आता अटळ असून या निवडणुकीसाठी शिवसेना अलर्ट मोडवर आली आहे. भाजपसोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा अयशस्वी झाली. यामुळे शिवसेना आता कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही.

शिवसेनेने आता पुढील तयारी म्हणून शिवसेना आमदार आणि समर्थक अपक्ष आमदार यांच्यासाठी आदेश जारी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ८ जून ते १० जून या दोन दिवशी सर्व आमदारांनी मुंबईत हजर रहावे असे आदेश काढण्यात आलेत.

शिवसेनेला पाठिंबा असणाऱ्या या सर्व सहयोगी विधानसभा सदस्यांची मुंबईतील नरिमन पॉईट येथील हॉटेल ट्रायडेंट येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे असे या आदेशात सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान 'वर्षा' या निवासस्थानी येत्या सोमवारी 6 जून रोजी राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीलाही सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे असे आदेश देण्यात आले आहेत.