मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा आवाज असा दाबला..!

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर शिवसेनेचा आवाज जाहीरपणे दाबला.

Updated: Jul 3, 2018, 07:18 PM IST
मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा आवाज असा दाबला..! title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : नाणार प्रकल्पावरून भाजप आणि शिवसेनेत घमासान सुरू असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर शिवसेनेचा आवाज जाहीरपणे दाबला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेतच मुख्यंमत्र्यांनी नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना मंत्र्यांना बाजू मांडण्याची संधी दिली नाही. 

नाणार प्रकल्पावरून मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता याबाबत शिवसेनेची भूमिका समजून घेतली असल्याचे उत्तर दिले. फडणवीस यांच्याच बाजूला बसलेले उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि इतर मंत्र्यांना शिवसेनेची नाणरबाबत काय भूमिका आहे, हे विचारले असता त्यामधे हस्तक्षेप करत ‘त्यांची भूमिका ते नंतर स्पष्ट करतील. ही माझी पत्रकार परिषद आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्याना बोलू दिले नाही.