CIDCO : आनंदाची बातमी! 7 हजार 849 घरांची लॉटरी जाहीर...

आपलं हक्काचं घर (house) असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. जर तुम्ही दिवाळीच्या मुहूर्तावर तुमचं हक्काचं घर घ्यायचा विचार करत आहात आणि कमी बजेटमध्ये तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण दिवाळीनिमित्त सिडकोनं खास भेट (CIDCO Lottery 2022) दिलीय. नवी मुंबईसारख्या (Navi Mumbai) शहरामध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना आणि हक्काच्या घरासाठी प्रयत्न करणाऱ्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे.  

Updated: Oct 24, 2022, 08:37 AM IST
CIDCO : आनंदाची बातमी! 7 हजार 849 घरांची लॉटरी जाहीर... title=
Cidco Lottery 2022 Diwali 2022 nmp

Cidco Lottery 2022 : आपलं हक्काचं घर (house) असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. जर तुम्ही दिवाळीच्या मुहूर्तावर तुमचं हक्काचं घर घ्यायचा विचार करत आहात आणि कमी बजेटमध्ये तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण दिवाळीनिमित्त सिडकोनं खास भेट (CIDCO Lottery 2022) दिलीय. नवी मुंबईसारख्या (Navi Mumbai) शहरामध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना आणि हक्काच्या घरासाठी प्रयत्न करणाऱ्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे.  

कमी किमतीत मिळणार घरं

दिवाळीनिमित्त  (Diwali 2022) सिडकोकडून लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. सिडकोकडून नवी मुंबईतील 7 हजार 849 घरांची लॉटरी लागणारंय..खारकोपर (Kharkopaar) आणि बामणडोंगरीमध्ये (Bamandongari) घरांची लॉटरी असणारंय..आजपासून घरांसाठी ऑनलाईन अर्ज  (Online application for Cidco Lottery 2022) करता येणारंय..(Cidco Lottery 2022 Diwali 2022 nmp)

गणेशोत्सवात काढली होती लॉटरी

यापूर्वी गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर सिडकोकडून लॉटरीबाबत (CIDCO Lottery 2022) मोठी घोषणा केली होती. नवी मुंबईत सिडकोकडून तब्बल 4,158 घरांची आणि 245 व्यापारी गाळ्यांची लॉटरी काढण्यात आली होती.