वरुण सरदेसाई भाचा आहे म्हणून मुख्यमंत्री गप्प आहेत का? मनसेचा खोचक सवाल

आंदोलन करत असताना शिवसैनिकांना घरी बसायला का सांगितलं नाही? असा सवालही मनसेने उपस्थित केला आहे.

Updated: Aug 31, 2021, 04:54 PM IST
वरुण सरदेसाई भाचा आहे म्हणून मुख्यमंत्री गप्प आहेत का? मनसेचा खोचक सवाल title=

मुंबई : मुंबई (Mumbai) आणि ठाण्यात (Thane) अनेक ठिकाणी मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी सरकारचे निर्बंध झुगारुन दहीहंडी फोडली. आता या दहीहंडी (Dahihandi) आयोजक असणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यावरुन मनसेने मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. 

कायदेभंग केला असेल तर आम्ही पळून जाणार नाही, कारवाईला सामोरं जाणार अशी प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिली आहे. सरकार दुटप्पी वागत आहे, आमच्यावर गुन्हा दाखल करता मग वरुण सरदेसाईवर (Yuvasena Varun Sardesai) अद्याप गुन्हा का दाखल केला नाही? माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत भाचा आहे म्हणून मुख्यमंत्री (CM Udhav Tahckeray) गप्प आहेत का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही दहीहंडी ठिकठिकाणी साजरी केली. मुख्यमंत्री दुसऱ्यांना सांगतात. मग स्वत:च्याच पक्षातील लोकांना घरी बसायला का सांगत नाहीत? आंदोलन करत असताना शिवसैनिकांना घरी बसायला का सांगितलं नाही? असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

दहीहंडी हे स्वातंत्र्ययुद्ध आहे का? असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला होता. यावर बोलताना संदीप देशपांडे यांनी हो... हे स्वातंत्र्ययुद्धच आहे, असं म्हटलं आहे. मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी घंटानाद आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यावर बोलताना राज ठाकरे जो आदेश देतील त्यानुसार आम्ही आंदोलन करु असंही देशपांडे म्हणाले.