खासदार संभाजी राजेंची विधिमंडळाच्या गेटवर अडवणूक

मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला खासदार संभाजी राजेंची उपस्थिती 

Updated: Feb 27, 2020, 02:59 PM IST
 खासदार संभाजी राजेंची विधिमंडळाच्या गेटवर अडवणूक title=

मुंबई :  खासदार संभाजी राजेंची विधिमंडळाच्या गेटवर अडवणूक करण्यात आली. स्वीय सहाय्यकांकडे पास नसल्यानं सुरक्षा रक्षकांनी राजेंना तब्बल १५ मिनिटं अडवल्याची घटना घडली.  खासदार संभाजी राजे यांना आज विधिमंडळच्या गेटवर जवळपास 15 मिनिटे ताटकळत उभं रहावं लागलं. मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला खासदार संभाजी राजे यांनी जाण्याचा निर्णय घेतला. तसे ते विधिमंडळ गेटवर आले देखील.

सुरक्षा रक्षकांनी खासदार यांना लगेच सोडलेही. मात्र त्यांच्या बरोबर असलेल्या स्वीय सहाय्यक, खाजगी सचिव यांना मात्र थांबवले. स्वीय साहाय्यक, खाजगी सचिव यांच्याकडे पास नसल्याने त्यांना आता सोडण्यास सुरक्षा रक्षकांनी नकार दिला. त्यामुळे संभाजीराजेंनीही मग पास घेऊन आत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे सुरक्षा सरक्षांची तारांबळ उडाली. 

स्वीय साहाय्यक, खाजगी सचिव यांच्याकडे पास नसल्याने त्यांना आता सोडण्यास सुरक्षा रक्षकांनी नकार दिला. मात्र विधिमंडळमध्ये आत नेमके कुठे जायचे हे माहीत नसल्याने स्वीय सहाय्यक बरोबर असणे आवश्यक असल्याचं राजे यांनी स्पष्ट केलं. अखेर विधिमंडळचे मुख्य सुरक्षा रक्षक गेटवर आले आणि खासदार यांच्याबरोबर स्वीय साहाय्यक, खाजगी सचिव यांना आता जाण्यास परवानगी दिली.

मात्र या प्रकाराने संतापलेल्या खासदार संभाजी राजे यांनी मग पास घेऊनच आता जाणार असल्याचा पवित्रा घेतला. अखेर स्वीय साहाय्यक, खाजगी सचिव यांच्यासाठी आवश्यक पास आल्यावर खासदार संभाजी राजे विधिमंडळमध्ये दाखल झाले.