मुंबई : खड्डेमुक्त महाराष्ट्रानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आणखी २ नव्या घोषणा केल्या आहेत. येत्या 3 वर्षांत राज्यभरातील रेल्वे क्रॉसिंग फाटकमुक्त करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. तसंच नद्यांवर असलेल्या पुलांना सेन्सर बसवण्यात येतील, अशी घोषणाही पाटील यांनी केली आहे. या सेन्सरमुळे नदीला पूर आल्यास त्याची सूचना तात्काळ ५० अधिकाऱ्यांना जाईल. त्यामुळे सावित्री नदीवर झालेल्या अपघातासारख्या घटना टाळता येतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
परभणी जिल्ह्यात वझुर गावात गोदावरी नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं. यावेळी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते.