मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले केंद्रीय गुन्हे अन्वेषण CBI विभागाचे पथक कामाला लागले आहे. काहीवेळापूर्वीच सीबीआयचे अधिकारी राहत असलेल्या नवी मुंबईतील गेस्ट हाऊसवर एका अज्ञात व्यक्तीला आणण्यात आले. त्यामुळे आता व्यक्ती नक्की कोण आहे, याची जोरदार चर्चा रंगली आहे.
#WATCH Mumbai: CBI team brings an unidentified person related to #SushantSinghRajput case, to the guesthouse where they are staying, for questioning. pic.twitter.com/sumv7kCpak
— ANI (@ANI) August 21, 2020
या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांच्या पाच टीम तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी एक टीम मृत्यूप्रकरणाशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी वांद्रे पोलीस स्थानकात पोहचली आहे. तर दुसरीकडे नवी मुंबईतील गेस्ट हाऊसवर चौकशी सत्राला प्रारंभ झाला आहे.
रिया चक्रवर्ती-महेश भट्ट यांचे व्हॉट्सऍप चॅट व्हायरल
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला गेस्ट हाऊसवर बोलावून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. याठिकाणी त्याची कसून चौकशी होईल. तर सुशांतचा कुक असणाऱ्या नीरज यालाही पाली हिल येथून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सीबीआय सर्वप्रथम नीरजचा जबाब नोंदवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
सुशांतच्या वजनाचा डमी पुतळा फासावर, सीबीआय क्राईम सीन रिक्रिएट करणार
सुशांतने नेमकी आत्महत्या केली होती की त्याची हत्या झाली हे तपासण्यासाठी सीबीआय टीम सुशांतच्या घरात क्राईम सीन रिक्रिएट करणार असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी सुशांतच्या वजनाला पुतळा फासावर लटकवला जाईल. जेणेकरून सीलिंग फॅन आणि बेडमध्ये नेमके अंतर किती आहे? सहा फूट उंचीच्या सुशांतचे पाय फासावर लटकताना बेडवर होते की खाली याची सीबीआयला खातरजमा करता येईल. यावेळी फॉरेन्सिक टीमदेखील उपस्थित असेल.