Budget 2021 : पेट्रोल डिझेलवरील अधिभारामुळे भडकले संजय राऊत

 हा अर्थसंकल्प देशाचा आहे की निधी वाटपाचा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. 

Updated: Feb 1, 2021, 03:06 PM IST
Budget 2021 : पेट्रोल डिझेलवरील अधिभारामुळे भडकले संजय राऊत title=

मुंबई : सरकारने बजेटमध्ये थापा मारू नयेत असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावलाय. देशाची अर्थव्यवस्था ही  महाराष्ट्र त्यातही मुंबईच्या महसूलावर उभी मात्र महाराष्ट्राला काहीच नाही असेही ते म्हणालेयत. कायम अन्याय होतो. केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्र दिसतच नाही असेही ते म्हणाले. 

महाराष्ट्र देशाचं पोट आहे पण या पोटाकडे कोणी पाहात नाही. फक्त दोनच शहरांना मेट्रोचं गुळ फासलं. हा अर्थसंकल्प देशाचा आहे की निधी वाटपाचा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. 

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजेट असेल तर ते देशाचं नव्हे तर एका राजकीय पक्षाचं बजेट आहे. त्यांना पेट्रोल बहुतेक 1000 रुपये लीटर करायचंय,
'पेट्रोलमुळे घरातच बसावं कायमचं असं त्यांना वाटतंय असा चिमटाही राऊत यांनी यावेळी काढला.

काय गोष्टी स्वस्त होणार?

चामड्याचं उत्पादन स्वस्त होणार 
ड्राय क्लिनिंग स्वस्त होणार 
लोखंडाचं उत्पादन स्वस्त होणार 
रंग स्वस्त होणार 
स्टीलची भांडी स्वस्त होणार 
इंश्युरन्स स्वस्त होणार 
वीज स्वस्त होणार 
चप्पल स्वस्त होणार 
नायलॉन स्वस्त होणार 
सोनं-चांदी स्वस्त होणार

या गोष्टी महागणार?

मोबाइल आणि चार्जर महागणार 
तांब्याच्या गोष्टी महागणार 
इलेक्ट्रॉनिक सामान महागणार 
कॉटनचे कपडे महागणार 
रत्न महागणार 
लेदलच्या गोष्टी महागणार 
सोलर इन्वर्टर महागणार