Mumbai Local Train Update: 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त असंख्य अनुयायी मुंबईक दाखल होतील. तेव्हा होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वने काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 2 ते 9 डिसेंबर या कालावधीत ही बंदी लागू असणार आहे. (Mumbai Local Train)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी मोठ्या संख्येने दादर येथील चैत्यभूमी येथे येतात. अशावेळी प्लॅटफॉर्मवरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर 6 डिसेंबर रोजी प्रचंड गर्दी होते. त्यामुळे फलाटांवरील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने लांब पल्ल्यांच्या स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नागरिकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्यांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे गाड्या व रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, पाचोरा रेल्वे स्थानकावर तात्पुरती प्लॅटफॉर्म तिकीटवर बंदी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व सोयी सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती भुसावळ रेल्वे मंडळांनी दिली आहे. 2 डिसेंबर ते 9 डिसेंबर पर्यंत प्लॅटफॉर्म टिकीटवर बंदी राहणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि कल्याण
जळगाव विभाग
बडनेरा, अकोला, नांदुरा, मूर्तिजापूर, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळिसगाव, मनमाड आणि नाशिक
नागपूर विभाग
नागपूर आणि वर्धा
पुणे आणि सोलापूर
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांकडून विशेष खबरदारीची पावले उचलण्यात आली आहे. गर्दीच्या नियोजनासाठी रेल्वेकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत. ५ आणि ६ डिसेंबर रोजी रेल्वेचे नियमित प्रवाशी तसेच दर्शनासाठी आलेले अनुयायी हे एकत्र आल्यामुळे स्थानक परिसरात अफाट गर्दी होईल. त्यामुळे रेल्वे पोलिसांसह आरपीएफ, गृहरक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि इतर सुरक्षा व्यवस्थेचा फौजफाटा दादर स्थानकात तैनात केला आहे. सुरक्षेसह पादचारी पुलांचे नियोजन प्रशासनाकडून केले आहे.