कोळीवाडे उध्वस्त करण्याचा डाव, कोळी बांधवांचा आरोप

कोळी बांधवांना घर खाली करण्याची नोटीस

Updated: Feb 5, 2019, 06:25 PM IST
कोळीवाडे उध्वस्त करण्याचा डाव, कोळी बांधवांचा आरोप title=

मुंबई : मुंबईचे मूळ रहिवासी कोळी बांधव मात्र हाच कोळी बांधव आता मुंबईतल्या कोळीवाड्यातुन हद्दपार होतोय की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. कारण झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सायन कोळीवाड्यातील कोळी बांधवांना घर खाली करण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. मात्र याला कोळी बांधवांचा मात्र तीव्र विरोध आहे. मुंबईसह ठाणे पालघर परिसरातील कलेक्टर जमिनीवरील कोळीवाड्यातील राहत्या घरांच्या जागा सातबारावर रहिवाशांच्या नावावर करण्यात येतील अशी घोषणा विधानसभेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. 

एकीकडे घोषणा होतायत मात्र प्रत्यक्षात नफेखोर बिल्डर, राजकारणी आणि नोकरशाही यांनी विविध नियमावलींचा बागुलबुवा करत हे कोळीवाडे उध्वस्त करण्याचा डाव सुरू केल्याचा आरोप  कोळी बांधवांनी केला आहे. या प्रश्नावर वेळीच तोडगा निघाला नाही तर आगामी काळात यावरून मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.