गणेश विसर्जनासाठी पालिका आणि पोलीस यंत्रणा सज्ज

 गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलीसांची संपूर्ण कुमक लावण्यात येते.

Updated: Sep 11, 2019, 11:42 PM IST
गणेश विसर्जनासाठी पालिका आणि पोलीस यंत्रणा सज्ज  title=

बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई : अकरा दिवसाच्या गणेशोत्सवानंतर आता गणेश विसर्जनाची वेळ जवळ आली आहे. उंचच उंच गणपती आणि मिरवणूक बघण्यासाठी गणेश भक्त बाहेर पडतात. या दिवशी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलीसांची संपूर्ण कुमक लावण्यात येते. मनपातर्फेही विशेष व्यवस्था करण्यात ये

पुण्या प्रमाणेच मुंबईतही गणपती विसर्जनाची मिरवणूक दिमाखदार असते. पहाटे पर्यंत विसर्जन सुरू असते. यावर्षीही मनपा कडून गणेश भक्तांसाठी विशेष व्यवस्था करण्यात अली आहे. पोलिसांतर्फे कडक सुरक्षा व्यवस्था असणार आहे. मुंबईत 129 ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात येणार आहेत.

चोख व्यवस्था 

50 हजार पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात आहेत.
-सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, वाहतूक विभागाचे कर्मचारी तैनात असतील
5 हजार पेक्षा जास्त cctv बसवण्यात आले आहेत
गिरगाव चौपाटी , शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी टी जंक्शन, पवई गणेश घाट अशा पाच महत्वाच्या ठिकाणी निरीक्षण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
वाहतूक विभागातर्फे 34 मनोरे उभारण्यात आलेत.
56 मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे.
18 मार्गावर मालवाहतूक वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले आहेत.
99 ठिकाणे नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
चौपाटीवर शामियाने, मनोरे उभारले आहेत
प्राथमिक उपचार केंद्राची व्यवस्था केली आहे.
जलरक्षक दलाचे 400 जवान तैनात आहेत.
एनएसएस, एनसीसी, स्काऊट, गाईड, नागरिक संरक्षण दल, वाहतूक रक्षक आणि स्वयंसेवी संस्थेचे हजारो कार्यकर्ते कार्यरत असणार आहेत.
तटरक्षक दल, जलतरण पटू आणि नौदलाच्या गस्ती बोटीही उपलब्ध आहेत

अनेक ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलले आहेत. तर काही मार्ग एकेरी करण्यात आलेत.  मुंबईतील 53 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
दक्षिण मुंबईतील नाथालाल पारेख मार्ग, जिनाभाई मूलजी राठोड मार्ग, जेएसएसरोड, व्हीपी रोड, आरआर रोड, बी.जे रोड, सीपी टॅंक रोड, कुंभारवाडा रोड, संत सेना मार्ग, नानुभाई देसाई रोड, सुतार गल्ली, विठ्ठलभाई पटेल मार्ग, जगन्नाथ शंकर शेठ मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, पंडिता रमाबाई मार्ग रस्ते बंद करण्यात आले आहेत.

तर मध्य मुंबईतील दत्ताराम लाड मार्ग, सानेगुरुजी मार्ग, डॉ. बी ए रोड, डॉ.एसएस रोड, डॉ. ई बोर्जेस रोड, जेरबाई वाडिया मार्ग 
तसेच शिवाजी पार्क, रानडे रोड, केळुसकर मार्ग, केळकर मार्ग, टिळक ब्रिज हे असे 53 रस्ते बंद करण्यात आले आहेत.