भाजपा आमदाराने मागितली मराठा आंदोलकांची माफी

काकडे यांनी मराठा आंदोलकांची माफी मागितली. 

Updated: Aug 4, 2018, 03:33 PM IST

मुंबई : मराठा आंदोलनला कुणी स्टंटबाजी म्हटलं असेल तर भाजपच्या वतीने माफी मागतो अशा शब्दात  खासदार संजय काकडे यांनी मराठा आंदोलकांची माफी मागितलीय. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने खासदार काकडे आणि अनिल शिरोळे यांच्या घर आणि आणि कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी काकडे यांनी मराठा आंदोलकांची माफी मागितली. 

आंदोलनाला पाठिंबा 

भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन स्टंटबाजी असल्याचं वक्तव्य केल्याचं वृत्त आलं होतं. त्यावर काकडे यांनी माफी मागितलीय. तसंच काकडेंनी मराठा आंदोलनला पाठिंबा दर्शवलाय. शांततामय आंदोलनाला पाठिंबा असल्याचे काकडेंनी जाहीर केलंय. चाकणमध्ये आंदोलन करताना अनेक समाजकंटक घुसले त्यांना पाठिंबा नसल्याचं काकडेंनी स्पष्ट केलंय. शिवाय मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे काकडे म्हणालेत.