बँक घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना मोठा दिलासा

बँक घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 

Updated: Oct 10, 2017, 12:11 PM IST
बँक घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना मोठा दिलासा title=

मुंबई : बँक घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. २२ नोव्हेंबरपर्यंत याप्रकरणाची चौकशी थांबवण्याचे निर्देश हायकोर्टाने सोमवारी जारी केले आहेत.

महाराष्ट्र बँक घोटाळाप्रकरणी अजित पवार यांच्यासह बँकेच्या इतर वरिष्ठ पदाधिकारी यांची चौकशी करण्यात येणार होती. मात्र, २२ नोव्हेंबरपर्यंत चौकशी करु नये, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे पवारांसह अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील सहकारी बँकांमधील शिखर बँक म्हणजे महाराष्ट्र बँक. गेल्या काही वर्षांच्या काळात ही बँक सतत तोट्यात आहे. कारण कर्ज वाटप करताना मोठी खैरात करण्यात आली. तब्बल दीड हजार कोटीचे कर्ज वाटप आहे. यासंदर्भात दाखल एका जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले होते. 

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बँकेवरील संचालक महामंडळ बरखास्त करत चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशांना याच प्रकरणातील एक आरोपी माधवराव पाटील यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने अजित पवारांसह इतरांना तात्पुरता दिलासा दिला आहे.