उद्धव यांच्या मध्यस्थीनंतर बेस्टचा संप अखेर मागे

बेस्ट कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. 

Updated: Aug 7, 2017, 04:44 PM IST
उद्धव यांच्या मध्यस्थीनंतर बेस्टचा संप अखेर मागे title=

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. काल मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता. संप मागे घेत लगेचच बेस्टचे कर्मचारी संध्याकाळपासून कामावर रुजू होणार आहे. कामगार नेता शशांक राव यांनी ही घोषणा केली आहे. बेस्ट आणि बीएमसीचे बजेट एकत्रीकरण केल्यानंतर बेस्ट कर्चमा-यांचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळं त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचं तोंडी आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिल्यानंतर शशांक राव यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली. 

मध्यरात्रीपासून मुंबईत बेस्ट बस कर्मचा-यांचा बेमुदत संप पुकारला होता. काल दिवसभरातल्या तीन बैठका अपयशी ठरल्यावर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी मध्यस्थीचा प्रयत्न केला आणि त्यांना यश आलं. दरम्यान आज सकाळपासूनच मुंबईकरांना मोठ्या त्रासाला समोरं जावं लागत होतं. बेस्टच्या ढसाळलेल्या आर्थिक स्थितीमुळे कर्मचाऱ्यांना दरमहा पगार वेळेवर देणंही बेस्टला शक्य होत नाही आहे. त्यामुळे आता बेस्ट कर्मचा-यांना बीएमसी कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा मिळावा आणइ महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पगार मिळावा या दोन प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता.