मुंबई : बॉटनेटचा वापर करून जगातील अनेक देशातील इंटरनेट सेवा बंद पाडणाऱ्या मिराई या सर्वात मोठ्या सायबर हल्ल्यानंतर आता त्याहीपेक्षा मोठ्या सायबर हल्ल्याची शक्यता आहे.
आता हा हल्ला थेट इंटरनेट आधारित उपकरणांवर होण्याची शक्यता आहे. यामुळे इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद पडू शकते. तेव्हा या हल्ल्यापासून सावध राहण्याचा इशारा राज्य पोलीस दलाच्या सायबर विभागाचे पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी दिलाय.
२०१६मध्ये मिराई नावाचा मोठा सायबर हल्ला झाला होता. या हल्ल्यामुले अनेक देशातील इंटरनेट सेवा बंद पडली होती. त्यावेळेस हल्लेखोराकडे पाच लाख वापरकर्त्यांचा तपशील उपलब्ध होता. आता याहीपेक्षा मोठा सायबर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.