आपण कठीण परिस्थितीकडे जातोय; बाळासाहेबांची भावनिक साद

समाजाच्या, स्वतःच्या, कुटुंबियांच्या भल्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायला हवे अशी भावनिक प्रतिक्रिया मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

Updated: Apr 12, 2021, 01:04 PM IST
आपण कठीण परिस्थितीकडे जातोय; बाळासाहेबांची भावनिक साद title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई  : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून तत्काळ महत्वाचे पावलं उचलणे गरजेचे आहे, त्यामुळे आपण कठीण परिस्थितीकडे जातोय. मुख्यमंत्री टास्क फोर्सबरोबर चर्चा करीत आहेत. लॉकडाऊन करावाच लागेल. समाजाच्या, स्वतःच्या, कुटुंबियांच्या भल्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायला हवे अशी भावनिक प्रतिक्रिया मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, तातडीने कटू निर्णय घेण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन लावत असताना हातावर पोट असणाऱ्यांसाठी काहीतरी करावेच लागेल. त्याचे नियोजन करण्यासाठी थोडा वेळ जात आहे.  असे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

मागील वर्षी आपण सगळ्यात चांगलं काम केलं होतं. 10 लाख लोकांना आपण दररोज जेवण देत होतो.  बाहेर जाणाऱ्या मजूरांची काळजी घेतली होती.  केंद्र सरकारने काय पॅकेज दिले कोणाला दिसले नाही.  दहावी बारावीच्या परीक्षेबाबत दोन दिवसात निर्णय होऊ शकतो. बुधवारी कॅबिनेट होऊ शकते. त्यात लॉकडाऊन आणि परीक्षेबाबत निर्णय अपेक्षित आहे. असेही थोरात यांनी सांगितले.

रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे उत्पादन होतं तिथून आपल्याला काही वाटा मिळावा अशी अपेक्षा आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंतीही थोरात यांनी केली.