अविनाश भोसले अटक प्रकरण, मुंबई सत्र न्यायालयाने दिले हे निर्देश

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना काल सीबीआयने (CBI) अटक केली. येस बँक-डीएचएफएल घोटाळा प्रकरणात (Yes Bank-DHFL Case) ही कारवाई करण्यात आली. याआधी सीबीआयने मुंबई आणि पुण्यात छापे टाकले होते. याप्रकरणी सीबीआयचा तपास सुरू होता. 

Updated: May 28, 2022, 10:42 AM IST
अविनाश भोसले अटक प्रकरण, मुंबई सत्र न्यायालयाने दिले हे निर्देश title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना काल सीबीआयने (CBI) अटक केली. येस बँक-डीएचएफएल घोटाळा प्रकरणात (Yes Bank-DHFL Case) ही कारवाई करण्यात आली. याआधी सीबीआयने मुंबई आणि पुण्यात छापे टाकले होते. याप्रकरणी सीबीआयचा तपास सुरू होता. 

त्यानंतर आज अविनाश भोसले यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सीबीआयकडून अविनाश भोसले यांची 10 दिवसांची कोठडी मागण्यात आली होती. पण मुंबई सत्र न्यायालयाने अविनाश भोसले यांना नजर कैदेत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 

अविनाश भोसले यांच्यावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकीलांनी रिमांडला विरोध केला. भोसले यांना वरळी इथल्या घरी किंवा सेंट रेजिस पंचताराकिंत हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात यावे अशी  मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती.

त्यावर सीबीआयकडून भोसलेंना बीकेसीच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवत त्यांना सर्व जेवण, मेडिकल सुविधा देण्याची तयारी दर्शवली. तसंच 28 आणि 29 मे रोजी एक तास 5 ते 6 या वेळेत त्यांचे वकिल विजय अग्रवाल आणि धवल मेहता  वकिलाना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. 30 मे रोजी अविनाश भोसले यांना सकाळी 11 वा कोर्टात घेऊन यावं असंही कोर्टाने सांगितलं आहे. 

 भोसलेंच्या रिमांडला विरोध करत दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देण्यासाठी सोमवारपर्यंत वेळ देण्यात आली आहे.