मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातील बैठक संपली आहे. घटकपक्षांना नेमक्या कोणत्या १८ जागा द्यायच्या याविषयी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याशी झालेल्या बैठकीचा तपशील दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तसेच भाजप शिवेसेनेच्या बैठकीत काही जागांच्या अदलाबदलीविषषी चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
उद्या भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कोणतीही बैठक नसेल. भाजप सेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाल्यावरच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.