मुंबई : Aryan Khan Drug Case: बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) चा मोठा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आता एनसीबी (NCB) च्या ताब्यात आहे. आर्यन खानला NCB ने ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. आर्यन खानचा खटला वकील सतीश मानेशिंदे लढत आहेत. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात दोन वेळा सुनावणी झाली आहे. 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत मोठे खुलासे झाले आहेत.
एनसीबीच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की तपासादरम्यान आर्यन खानच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या आहेत. या गोष्टींची चौकशी करणे आवश्यक आहे. यामधून मुंबईत चालवल्या जाणाऱ्या ड्रग नेक्ससबद्दल अधिक माहिती मिळू शकते.
एनसीबीने कोर्टात सांगितले आहे की, आर्यन खानच्या फोनमध्ये अनेक कोड नावे सापडली आहेत. आर्यन खान त्यांच्याशी बोलतो. एनसीबी आर्यन खानकडून या कोड नावांची चौकशी करेल.
एनसीबीने आर्यन खानच्या व्हॉट्सऍप चॅटचा शोध घेतला असता त्यांना पैशांच्या व्यवहारांची माहिती मिळाली. एनसीबीसाठी हे एक मोठे यश आहे. जे आर्यन खानच्या अडचणी वाढवू शकते.
न्यायालयात चर्चेदरम्यान एनसीबीने म्हटले की, आर्यन खान जहाजावर का गेला याचे खरे कारण अद्याप उघड झालेले नाही. आर्यन जहाजावर पार्टीसाठी गेला होता की अन्य काही कारणांमुळे, हे अद्याप निश्चित झालेले नाही. सतीश मानशिंदे यांनी त्यांच्या वतीने सांगितले आहे की, आर्यनला पार्टीमध्ये विशेष पाहुणे म्हणून बोलावले होते आणि त्याचा या सगळ्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.
आर्यन खानच्या चौकशी दरम्यान, तो 4 वर्षांपासून ड्रग्ज घेत असल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आर्यनने स्वतः मान्य केले आहे. ही बाजू लक्षात घेऊन न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे.