निसर्ग चित्रकार भागवत सपकाळे यांच्या चित्रांचे नेहरू आर्ट गॅलरीत प्रदर्शन

आतापर्यंत जहांगिर आर्ट गॅलरी, कोहीनूर आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, ३डी आर्ट गॅलरी अशा नामवंतर गॅलरींमध्ये भागवत सपकाळे यांच्या चित्रांचे प्रदर्शन झाली आहेत.

Updated: Jun 4, 2018, 04:01 PM IST
निसर्ग चित्रकार भागवत सपकाळे यांच्या चित्रांचे नेहरू आर्ट गॅलरीत प्रदर्शन title=

मुंबई: निसर्ग चित्रकार भागवत सपकाळे यांच्या निसर्ग चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील सुप्रसिद्ध नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ५ जून ते ११ जून २०१८ या कालवधीत सुरू राहणार आहे.

छंदच बनला जिवनाचे साधन

जळगावपासून काही अंतरावर असलेल्या फुफणीसारख्या खेडेगावातून शिक्षणासाठी बाहेर पडलेले भागवत सपकाळे हे नोकरीच्या शोधात मुंबईत आले आणि येथेच स्थाईक झाले. लहानपणापासूनच रेखाटने आणि चित्रे काढण्याचा सपकाळे यांना छंद होता. हा छंदच पुढे त्यांच्या जिवनाचे साधन झाला. धुळ्यासारख्या ग्रामिण भागातील शहरातून शिक्षण घेतलेले भागवत सपकाळे हे मुंबईतील विमानतळ संस्थेत कला शिक्षक म्हणून ऋजू झाले.

 

नामवंत आर्ट गॅलरींमधून चित्रांचे प्रदर्शन

संस्कृती, सर्वसामान्य लोकांच्या जगण्याचा संघर्ष, लोकजिवन हा सपकाळे य़ांच्या चित्रकलेतील मूळ गाभा. त्यांनी आतापर्यंत अनेक नामवंत व्यक्ती, स्थळे आणि विविध प्रकारातील चित्रे काढली आहेत. उपक्रमशिल कलाध्यापक पुरस्कार, कलामित्र पुरस्कार, कलाभुषण पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आतापर्यंत जहांगिर आर्ट गॅलरी, कोहीनूर आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, ३डी आर्ट गॅलरी अशा नामवंतर गॅलरींमध्ये भागवत सपकाळे यांच्या चित्रांचे प्रदर्शन झाली आहेत.

या चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, शिवसेनेचे स्थानिक नेते दशरथ पाटील, उपशिक्षण संचालक राजेंद्र अहिरे, नगरसेवक उमेश पाटील तसेच, मुंबई विमानतळाचे प्रमुख केशव वर्मा हे उपस्थित राहणार आहेत.