शिवसेनेच्या पाठिशी राष्ट्रवादीची ताकद, अजित पवार यांनी दिले स्पष्ट संकेत

गेल्या निवडणुकीत आमच्या पक्षाच्या उमेदवार फौजीयाताई यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने मदत केली होती. 

Updated: May 26, 2022, 04:11 PM IST
शिवसेनेच्या पाठिशी राष्ट्रवादीची ताकद, अजित पवार यांनी दिले स्पष्ट संकेत title=

मुंबई : संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chatrapati ) यांच्या उमेदवारीबाबत काय झाले ते सर्वाना माहित आहे. ते शिवसेनेत आले असते तर त्यांना उमेदवारी मिळाली असती आणि ते निवडूनही आले असते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार नाही असा माझा अंदाज आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी दिली.

संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेना पहिल्यापासून बोलत होते की आमच्या पक्षाचं तिकीट घेतलं की आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. शिवसेनेने ( Shivsena ) या निवडणुकीत दोन उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही शिवसेनेला पाठिंबा देणार आहोत असे अजितदादा म्हणाले.

गेल्या निवडणुकीत आमच्या पक्षाच्या उमेदवार फौजीयाताई ( Faujiya Khan ) यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने मदत केली होती. त्यावेळी पुढील वेळी शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादीने ( NCP ) पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आता राष्ट्रवादीचा पाठिंबा शिवसेनेच्या उमेदवाराला असेल असे ते म्हणाले.

आताचे संख्याबळ पहाता ( BJP ) भाजप २, ( Shivsena ) शिवसेना १, ( Congress ) काँग्रेस १, ( NCP ) राष्ट्रवादी १ असे उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. भाजपच्या दोन जागा येतील तरीही त्यांच्याकडे अपक्ष धरून २७ मते शिल्लक राहतात. तर महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि अपक्ष यांची संख्या मिळून चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.

राज्यसभा निवडणुकीत जे पक्षाचे मतदार असतात ते दाखवून मतदान करतात. पण, खरी मदार ही अपक्ष आमदारावर अवलंबून आहे. या निवडणुकीचा सगळं खेळ आता अपक्ष आमदार यांच्या हातात आहे. त्यांचा निर्णय ते घेतील असे सूतोवाच अजित पवार यांनी केलं.