मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाला आणखी एक दणका अजित पवारांनी दिला आहे. मुंबई-पुणे हायपर लूप या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला स्थगितीचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. जगात कुठे झालं नाही, ते पहिल्यांदा कुठेतरी होऊ द्या,
ट्रायल आपल्याकडे घेण्याची आपली क्षमता नाही, ते कुठेतरी यशस्वी होऊ द्या, मग आपण ते करू, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
तर मेट्रोच्या विस्ताराची घोषणा अजित पवारांनी केली आहे. पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी पहिली बैठक पुण्यात घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे.