Maharashtra Rain : दरवर्षी का लांबतोय पावसाळा?

ऑक्टोबर उजाडला तरी राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी कायम आहे. 

Updated: Oct 10, 2022, 11:58 PM IST
Maharashtra Rain : दरवर्षी का लांबतोय पावसाळा?  title=

अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पावसाळ्याचे चार महिने कोणते असा प्रश्न शाळकरी विद्यार्थ्यालाही विचारला तरी तो जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असं उत्तर देईल. मात्र गेल्या काही वर्षात पावसाळा ऑक्टोबरपर्यंत लांबल्याचं चित्र पाहायला मिळतंय. यंदाही हीच स्थिती आहे. पावसाच्या परतीची वाट नेमकी का खडतर झालीय, पाहूयात रिपोर्ट. (according to weather experts main reason behind the prolongation of monsoon is the low pressure bands in the air) 

ऑक्टोबर उजाडला तरी राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी कायम आहे. अशातच हवामान विभागानं पुढील 72 तासांत राज्यात ठिक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलाय. 13 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोरही कायम राहिल असं हवामान विभागानं म्हंटलंय. गेल्या काही वर्षात पावसाळा ऑक्टोबरपर्यंत लांबल्यानं ऋतुचक्र बदलल्याचं पाहायला मिळतंय. 

हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार पावसाळा लांबण्यामागचं मुख्य कारण आहे हवेतील कमी दाबाचे पट्टे... जेव्हा उष्णता वाढते तेव्हा हवेचा दाब कमी होतो. त्यामुळे हवा वरच्या दिशेने जाते. त्यामुळे अधिक दाबाचा पट्टा असलेल्या परिसरातील ढग अपेक्षेनुसार कमी दाबाच्या परिसरात जातात यामुळेच पाऊस होतो. याशिवाय मान्सून उशीरा सक्रिय होत असल्यानं तो परतण्यासही उशीर होत असल्याचं सांगण्यात येतंय. एकीकडे ऑक्टोबर हिट आणि दुसरीकडे अधून मधून येणारा पाऊस, अशी विचित्र स्थिती सध्या अनुभवायला मिळतेय.