धक्कादायक... कुजलेल्या अवस्थेत रुग्णालयाच्या शौचालयात आढळला मृतदेह

पोलिसांकडून तपास कार्य सुरू  

Updated: Oct 24, 2020, 08:36 AM IST
धक्कादायक... कुजलेल्या अवस्थेत रुग्णालयाच्या शौचालयात आढळला मृतदेह title=

मुंबई : रूग्णालयाच्या शौचालयात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह अढळल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे रुग्णालायाच्या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. हा धक्कादायक प्रकार शिवडीच्या टीबी रुग्णालयातील असल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होत होता का... शौचालयात अढळलेल्या मृतदेहावर कोणाला कसा दिसला नाही... अशा एकना अनेक बाबींचा तपास रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस करीत आहेत.

टीबी रुग्णालयाच्या प्रशासनाकडून ही माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर घटनेची माहिती कळताच रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे कठिण झाले. मात्र रुग्णालय प्रशासनाच्या नोंदी आणि इतर सर्व बाबी तपासल्यानंतर या व्यक्तीची ओळख पटली.

रुग्ण सदर रुग्णालयात उपचार घेत असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून निष्पन्न झालं. तर याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.  तपासात येणाऱ्या तथ्यानुसार पुढील कारवाई केली जाईल असं वक्तव्य पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील सोहोनी यांनी केलं. 

दरम्यान ४ ऑक्टोबर रोजी रुग्णालयातून एक २७ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार रुग्णालय प्रशासनाकडून नोंदवण्यात आली होती. परंतु ही तिच व्यक्ती आहे का? हे अद्याप समजू शकलेलं नाही. असं रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.